शीघ्रपतनाची समस्या (Premature ejaculation problem)बऱ्याच घरात लाजिरवाणी समजली जाते. लग्नानंतर बराच काळ उलटून गेल्यानंतरही शीघ्रपतनाची तक्रार (Complaints of premature ejaculation) असलेले काही पुरुष असतात. समजा मुल झाले नाही तर त्यांच्यावर जास्त ताण येतो. परंतु ही समस्या सोडवली जाऊ शकते त्यासाठी डॉक्टर काही सोपे उपाय सांगतात ते केल्याने हा दोष दूर होऊ शकतो. आणि गरज असल्यास औषधोपचारही सांगितला जातो. प्रत्येक रुग्णाची समस्या वेगवेगळ्या प्रकारे हाताळली जाते.

डॉक्टरांच्या सल्यानुसार  पुरुषांमध्ये समागम करतेवेळी एक खास सूचना पाळण्याचं एक विशेष तंत्र दांपत्यांना शिकवलं जातं. त्यात  संवेदनांचा आवेग सहन होण्यापलीकडे जाण्याआधीच जर समागम तात्पुरता थांबवलं आणि आवेगाची तीव्रता ओसरू द्यावा.या पद्धतीने समागमाचा काळ वीर्यस्खलन (Ejaculation during intercourse) न होऊ देता वाढवता येऊ शकतो. आणि  यासाठी पती-पत्नीमध्ये एकमेकांना सूचना देण्याबाबत आधीच ठरवलेलं असणं गरजेचं असतं. समागम करतेवेळी(During intercourse)जेव्हा संवेदना वाढत जातात तेव्हा संदवेनांचा आवेग आटोक्यात असतानाच समागम तात्पुरता थांबवून वीर्यस्खलन टाळता येऊ शकतं. त्यानंतर आवेगाची तीव्रता कमी होताच समागम पुन्हा सुरू करता येऊ शकतो. अशा प्रकारे काही वेळ थांबत समागम होऊ दिल्यास शीघ्रपतनाची तक्रार कमी होण्यास मदत होते.

दुसरे सामान्य कारण म्हणजे दोन लैंगिक समागमांच्या(sexual intercourse)मध्ये  जर खूप मोठा काळ गेला असेल तर त्यामुळेही शीघ्रपतन (premature ejaculation)होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती काही महिन्यांसाठी समागम करत नाही, तेव्हा शुक्रजंतूंचा (spermatozoa)मोठा साठा वृषणामध्ये साचला जातो. अशा अवस्थेत संभोग सुरू करताच किंवा अगदी प्रणयक्रिडेदरम्यान सुद्धा अचानकपणे वीर्यपतन होण्याची शक्यता असते. 

सेक्स व्हिडीओ पाह्ल्याने पण  निराशा येते. एकदा लैंगिक संबंध आल्यावर  थोडासा वेळ मध्ये जाऊ देऊन लगेच दुसऱ्यांदा संभोग केल्यास शीघ्रपतन होत नाही. काही पुरुषांना संभोगासाठी लागणारी ताठरता शिश्नामध्ये पुन्हा निर्माण होण्यास खूप वेळ लागतो. अशा पुरुषांना संभोगाआधी काही तास हस्तमैथून करण्याचा सल्ला काही डॉक्टर देतात. याचा काहीजणांना उपयोग होतो व शीघ्रपतनाची समस्या (Premature ejaculation problem)कमी होऊ शकते.

पुरुषांमध्ये असेलली अधिरता, उतावळेपणा व ताण तणाव यामुळेही लैंगिक संबंध ठेवताना शीघ्रपतन होते. पण सगळ्यात महत्वाचे आहे की कुठेही वाचून किंवा व्हिडीओ पाहून उपाय करून घेणे योग्य नसते, कारण समस्या पुढे वाढू शकते. म्हणूनच  कधी कधी शारीरिक उपायांबरोबर  मानसिक उपायांची ही गरज भासते. त्यासाठी  मनोचिकित्सा(psychotherapy), समुपदेशन आणि सेक्स थेरपीस्ट यांची मदत घेता येऊ शकते. योग्य वेळेत उपचार होणे खूप गरजेचे आहे.

डॉ. इरफान शेख , यूरोलॉजिस्ट (Urologist) आणि यूरो सर्जन (Uro Surgeon) (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील टॉप युरोलॉजिस्टपैकी (Top Urologist in Pune) एक आहेत. डॉ. इरफान शेख हे युरोलॉजी विभागातील सुवर्णपदक विजेते आहेत.  त्यांनी पुण्यातील बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले आहे. तसेच  पीजीआय, चंदीगड येथून जनरल सर्जरीमध्ये एमएस केले आहे.  डॉ. इरफान शेख आपल्या रूग्णांवर वर्षानुवर्षे यशस्वीपणे उपचार करत आहेत.

Urolife Clinic तुम्हाला सर्व प्रकारच्या युरोलॉजिकल उपचार सेवा प्रदान करते, जसे की किडनी स्टोनचे उपचार, मूत्राशयातील खडे उपचार, प्रोस्टेट कर्करोग उपचार, किडनी कर्करोग उपचार, आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार, RIRS शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोन काढण्यासाठी PCNL शस्त्रक्रिया आणि एन्ड्रोलॉजिकल ट्रीटमेंट सेवा. तसेच सेक्सोलॉजी थेरपी यावरही उपचार होतात.