सामान्यतः पुरुषांना होणारी लैंगिक समस्या म्हणजे अकाली वीर्यपतन ज्याला शीघ्रपतन (Premature Ejaculation) म्हणतात. 18 ते 59 वयोगटातील पुरुषांमध्ये ही दिसून येते. संभोग करताना लिंगातून खूप लवकर वीर्य बाहेर पडते त्यामुळे पूर्णपणे लैंगिक आनंद न मिळणे ही समस्या लग्न झाल्यावरही जाणवते. ही समस्या असण्याचे लक्षणे, कारणे आणि उपाय पाहूयात.

शीघ्रपतनाची लक्षणे (Symptoms of Premature Ejaculation in Marathi)

१. कामोत्तेजन झाल्यावर लगेचच किंवा काही सेकंदात वीर्यस्खलन होणे.

२. संभोग सुरु केल्यापासून ६० सेकंदाच्या आत वीर्य स्खलन होणे.

३. कामोत्तेजन न होणे.

४. संभोग सुरु करण्याआधीच वीर्य स्खलन होणे.

शीघ्रपतनाची कारणे (Causes of Premature Ejaculation in Marathi)

असे मानले जाते की अकाली वीर्यपतन दोन कारणांमुळे होते. एक म्हणजे मानसिक आणि दुसरे कारण म्हणजे शारीरिक त्याला जैविक घटकही जबाबदार आहेत.

मानसशास्त्रीय कारणे (Psychological Reasons in Marathi)

 • कमजोर शरीरयष्टी
 • नैराश्य आणि चिंता
 • नातेसंबंधातील समस्या
 • इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) – उच्च रक्तदाब, मधुमेह ही कारणे असतात.
 • व्यसन
 • भूतकाळातील लैंगिक अनुभव
 • अपराधीपणाची भावना
 • आत्मविश्वासाचा अभाव
 • अवास्तव लैंगिक अपेक्षा
 • लैंगिक शोषण

शीघ्रपतनाची जैविक कारणे (Biological Causes of Premature Ejaculation in Marathi)

 • अनुवांशिकता
 • मूत्रमार्ग किंवा प्रोस्टेटचा संसर्ग किंवा जळजळ
 • हार्मोनची असामान्य पातळी
 • न्यूरोट्रांसमीटरची असामान्य पातळी

शीघ्रपतनाचे उपाय (Remedies for Premature Ejaculation in Marathi)

 • शीघ्रपतनाचा अनुभव आल्यास निराश न होता थोडासा वेळ मध्ये जाऊ देऊन एकापाठोपाठ दुसऱ्यांदा संभोग केल्यास शीघ्रपतन होत नाही. काही पुरुषांना संभोगासाठी लागणारी ताठरता शिश्नामध्ये पुन्हा निर्माण होण्यास खूप वेळ लागतो आणि दुसऱ्यांदा संभोग करणं लगेचच जमत नाही. अशा पुरुषांना संभोगाआधी काही तास हस्तमैथून करण्याचा सल्ला काही डॉक्टर देतात.
 • एक विशेष तंत्र डॉक्टर दांपत्यांना सांगतात ते म्हणजे आवेग सहन होण्यालिकडे जाण्याआधीच समागम तात्पुरता थांबवणे आणि आवेगाची तीव्रता कमी झाल्यावर समागम करणे .
 • खूप थकवा आल्यास शीघ्रपतन होऊ शकते , त्यामुळे विश्रांती आवश्यक आहे.
 • शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे.
 • हलका आहार घ्यावा.
 • धुम्रपान , मद्यपान केल्याने बर्याच जणांना हा त्रास जाणवतो.
 • सगळ्यात महत्वाचे म्हणजे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 • स्वभावातली अधिरता आणि उतावळेपणा कमी व्हावा यासाठी उपाय करणंही गरजेच असतं. .
 • हा उपाय मनोचिकित्सा, समुपदेशन आणि सेक्स थेरपी यांच्या मदतीने करता येऊ शकतो.
 • दांपत्यामध्ये झालेला विश्वासपूर्वक संवादही ही समस्या कमी करण्यास मदत करतो.

डॉ. इरफान शेख – Consultant यूरोलॉजिस्ट, यूरो सर्जन, सेक्सोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील best सेक्सोलॉजिस्टपैकी एक आहेत (Best Sexologist in Pune). A gold medalist in the department of Urology, Dr. Irfan Shaikh specializes in Female Urology in India. He has completed his education at one of the top colleges. He has completed MBBS from Byramjee Jeejeebhoy Government Medical College & Sasson General Hospital in Pune and MS in general surgery from PGI, Chandigarh. Moreover, he has also done M.Ch in Urology from Topiwala National Medical College & BYL Nair Charitable Hospital. डॉ. इरफान शेख त्यांच्या रूग्णांवर सर्व वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याने उपचार करण्याची खात्री देतात.