लघवीच्या जागी जळजळ (Urinary Tract Infection) होणे हे फार काळ होत असेल, तर ते सामान्य लक्षण नाही. काहींना सारखी लघवीला होते तर अनेक लोकांमध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये लघवीला होताना जळजळ होते. लघवी करताना जळजळ होत असेल किंवा खाज येत असेल तर युरिन इन्फेक्शन (Urine Infection) झालं असण्याची शक्यता आहे. स्त्रियांमध्ये किंवा वयात येणाऱ्या मुलींमध्ये युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. जरी प्रमाण कमी असले तरी पुरुषांमध्ये सुद्धा हा त्रास दिसून येतो. ह्या आजाराला UTI (Urinary Tract Infection) असंही म्हटलं जातं. यावर लवकर उपचार न केल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

UTI चा अर्थ मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच युरिन इन्फेक्शन. याची लक्षणे काय आहेत ते पाहुया.

UTI ची लक्षणे काय आहेत? (Symptoms of Urinary Tract Infection in Marathi)

  • लघवी करताना जळजळ आणि खाज येणे.
  • वारंवार लघवीला जाणे.
  • लघवी अर्धवट झाली आहे असे वाटणे.
  • काहीवेळा लघवीमधून रक्त जाणे.
  • लघवी मधून काही वेळा पस जाणे.
  • थंडी वाजून ताप येणे.
  • भूक न लागणे.
  • ओटीपोटात वेदना आणि जडपणा येणे.
  • पोटात मळमळणे.
  • सतत अस्वस्थ वाटणे.
  • लघवीचा रंग बदलणे.

UTI ची कारणे काय आहेत? (Causes of Urinary Tract Infection in Marathi)

  • अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. शारीरिक स्वच्छतेचा अभाव असेल तर हा त्रास होण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य शैलीतील अस्वच्छ शौचालयांचा वापर केल्यानेही हा आजार होतो.
  • लघवी रोखून धरल्याने सुद्धा  हे इनफेक्शन (Infection) होते.
  • मधुमेह (Diabetes) असल्यास हा त्रास होऊ शकतो.
  •  कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)असेल तर लघवीच्या जागी जळजळ (UTI) होते.
  • अनेक लोकांसोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याने युरिन इन्फेशन (UTI) होऊ शकतो.

UTI चे उपचार काय आहेत? (Treatments for Urinary Tract Infection in Marathi)

घरगुती उपाय करण्यापेक्षा UTI झाल्यावर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. डॉक्टर पांढऱ्या रक्त पेशी, लाल रक्तपेशी किंवा जीवाणू शोधण्यासाठी लॅब टेस्ट (Labrotrary Test) करतात त्यासाठी लघवीचे नमुने घेतात. लॅबमध्ये मूत्रमार्गातील बॅक्टेरिया (Bacteria in Urinary Tract) तपासला जातो. लघवीची लॅब टेस्ट कधीकधी यूरिन कल्चर मार्फत केली जाते. ही टेस्ट डॉक्टरांना सांगते की कोणते जिवाणू  युरीन इन्फेक्शनला कारणीभूत आहे. त्यानुसार औषधे दिली जातात आणि हा त्रास थांबतो. आजार वाढण्यापेक्षा वेळेत उपचार घेणे महत्वाचे ठरते.

तुम्हालाही लघवीच्या जागी जळजळचा (UTI) त्रास होत असल्यास डॉ. इरफान शेख डॉक्टरांना भेटणे आणि सल्ला घेणे आवश्यक आहे. यूरोलाइफ क्लिनिक पुणे.

डॉ. इरफान शेख , यूरोलॉजिस्ट (Urologist) आणि यूरो सर्जन (Uro Surgeon) (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील टॉप युरोलॉजिस्टपैकी (Top Urologist in Pune) एक आहेत. डॉ. इरफान शेख हे युरोलॉजी विभागातील सुवर्णपदक विजेते आहेत.  त्यांनी पुण्यातील बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले आहे. तसेच  पीजीआय, चंदीगड येथून जनरल सर्जरीमध्ये एमएस केले आहे.  डॉ. इरफान शेख आपल्या रूग्णांवर वर्षानुवर्षे यशस्वीपणे उपचार करत आहेत. Urolife तुम्हाला सर्व प्रकारच्या युरोलॉजिकल उपचार सेवा प्रदान करते, जसे की किडनी स्टोनचे उपचार, मूत्राशयातील खडे उपचार, प्रोस्टेट कर्करोग उपचार, किडनी कर्करोग उपचार, आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार, RIRS शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोन काढण्यासाठी PCNL शस्त्रक्रिया आणि एन्ड्रोलॉजिकल ट्रीटमेंट सेवा. तसेच सेक्सोलॉजी थेरपी यावरही उपचार होतात.