आपले मूत्रपिंड म्हणजे शरीराला आतून स्वच्छ करणारे, विषारी व निरूपयोगी घाण बाहेर फेकणारे अवयव आहेत. मात्र हीच स्वछतेची क्रिया त्यावेळी अतिशय त्रासदायक ठरते.मूत्रपिंडातील ह्या आजाराचा प्रादुर्भाव स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक जाणवतो. किडनी स्टोन(Kidney Stones) अथवा युरिनरी स्टोन्स (Urinary Stones ) हे छोट्या मोठ्या आकारांच्या दगडाप्रमाणे असतात. 

काही खनिजांच्या एकाच ठिकाणी साचत जाण्यामुळे हे खडे निर्माण होतात. शरीरातील कॅल्शियम(Calcium), युरिक ऍसिड(Uric Acid) , किंवा स्ट्रुव्हाईट या घटकांची मात्रा वाढल्यामुळे किंवा सिस्टीन ऍसिडच्या गळतीमुळे – सिस्टीनुरियामुळे ही साचण्याची प्रक्रिया घडते. ऍसिड आणि खनिजांच्या पातळीसोबतचं आणखी काही वैद्यकीय कारणेही या खड्यांच्या निर्मितीला कारणीभूत ठरू शकतात. जसे की, हायपरपॅराथाईरॉयडिसम्, किडनीचे दुखणे, पचनसंस्थेचे विकार, लघवीच्या मार्गातले संसर्गदोष ह्यांमुळे मूत्रखडे निर्माण होण्याची शक्यता वाढते.

हे मुतखडे (Urinary Stones) जेव्हा लहान असतात तेव्हा कुठलेही लक्षण दिसत नाहीत. नंतर जेव्हा मूत्रखडा (Urinary Stones) पुढे पुढे सरकायला लागतो तेव्हा खालीलप्रमाणे लक्षणे दिसायला लागतात. 

 • लघवीचा रंग लाल, गुलाबी किंवा दाट केशरी होणे.
 • लघवीला उग्र वास येणे.
 • प्रत्येक वेळी थोडी थोडी लघवी होणे आणि लघवी करताना लघवी मार्गात वेदना होणे.
 • मळमळ वाटणे, उलटी होणे.
 • कंबरेच्या मागच्या खालच्या भागात आणि बाजूच्या भागात दुखणे.
 • मांडीच्या सांध्यात आणि ओटीपोटात दुखणे.

वेदनेच्या कधी कळा तर कधी लहरी येऊ शकतात. तसेच खडा जसा जागा बदलतो, पुढे सरकतो तशी तशी वेदनेची जागा सुद्धा बदलते. तीव्र आणि सततची वेदना असेल तर त्वरित वैद्यकीय उपचार करावे.

जर मुतखडे (Urinary Stones) लहान आकाराचे असतील यावरचा उपाय सोपा आहे तो म्हणजे भरपूर पाणी प्यावे म्हणजे लघवीच्या प्रवाहाबरोबर ते खडे बाहेर पडू शकतात.

युरिनरी स्टोन्स उपचार (Treatment for Urinary Stones) 

दिवसातून 1.8 ते 3.6 लीटर पिण्याचे पाणी प्यायल्याने तुमची लघवी पातळ होईल आणि त्यामुळे खडे  तयार होण्यापासून थांबू शकतात.

जर मुतखडे मोठया आकाराचे असतील तर औषधोपचार, शस्त्रक्रिया, स्कोप, शॉक – वेव्ह पद्धतीने हे मुतखडे काढले जातात.

मुतखड्यांच्या पुनर्निर्मितीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ते होऊ नये म्हणून पुढील प्रकारे दक्षता घ्यावी.

 • जलपदार्थ खास करुन पाणी जास्त प्यावे.
 • आहारात बदल करावा.
 • वय आणि उंची लक्षात घेऊन त्या प्रमाणात वजन ठेवावे.
 • रक्त आणि मुत्रांमधील खनिज व युरिक ऍसिडची पातळीची सतत तपासणी करावी. 
 • लघवी मार्गात संसर्गदोष निर्माण होऊ नये ह्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. कारण एकदा मुतखडे झाले की असा संसर्ग पुन्हा होऊ शकतो. 

युरिनरी स्टोन्सची (Urinary Stones) कोणतीही  लक्षणे दिसल्यास त्वरित उपचारांसाठी युरोलाइफ क्लिनिकमध्ये डॉ. इरफान शेख यांचा सल्ला घ्या. त्याने पुढचा त्रास टाळला जातो.

डॉ. इरफान शेख यूरोलॉजिस्ट (Urologist) आणि यूरो सर्जन (Uro Surgeon) (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील टॉप युरोलॉजिस्टपैकी (Top Urologist in Pune) एक आहेत. डॉ. इरफान शेख हे युरोलॉजी विभागातील सुवर्णपदक विजेते आहेत.  त्यांनी पुण्यातील बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले आहे. तसेच  पीजीआय, चंदीगड येथून जनरल सर्जरीमध्ये एमएस केले आहे.  डॉ. इरफान शेख आपल्या रूग्णांवर वर्षानुवर्षे यशस्वीपणे उपचार करत आहेत. Urolife तुम्हाला सर्व प्रकारच्या युरोलॉजिकल उपचार सेवा प्रदान करते, जसे की किडनी स्टोनचे उपचार, मूत्राशयातील खडे उपचार, प्रोस्टेट कर्करोग उपचार, किडनी कर्करोग उपचार, आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार, RIRS शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोन काढण्यासाठी PCNL शस्त्रक्रिया आणि एन्ड्रोलॉजिकल ट्रीटमेंट सेवा. तसेच सेक्सोलॉजी थेरपी यावरही उपचार होतात.