मूतखडा किंवा किडनी स्टोन (Kidney Stone) हा सामान्य आजार वाटला तरी दुर्लक्ष केल्यास बराच त्रास देणारा आजार आहे.सुरुवातीच्या काळातच जर  लक्षणं ओळखता आली तर आजाराचे उपचार करणे सोपे जाते.  मुतखड्यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. त्या वेदना कमीजास्त वेळेसाठी होत राहतात.  कधीकधी रुग्णांना मळमळ उलटीचाही त्रास होतो. प्राथमिक लक्षणांमध्ये लघवी सामान्य न होणे,  खूप घाम येणे अशी लक्षणे असतात. याकडे दुर्लक्ष केल्यास तो त्रास बळावत जातो आणि शेवटी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते.

मूतखडा किंवा किडनी स्टोन झाला, हे कसे ओळखाल?

लघवीला वारंवार लागणे:

हे सामान्य लक्षण आहे. किडनी स्टोनने (Kidney Stone) ग्रस्त लोकांना सतत  लघवीला जावं लागतं. याचे कारण म्हणजे किडनी स्टोन मूत्रमार्गातून मूत्राशयात जाणे, हे आहे. खडे मूत्राशयात गेल्यावर  त्रास वाढत जातो. आणि लघवी करताना खूप त्रास होतो. असा त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

लघवीतून रक्त येणे:

किडनी स्टोनची समस्या वाढल्यावर  लघवीचा रंग बदलतो. लघवीचा रंग सामान्यतः पिवळा असतो पण तो रंग  गडद होतो आणि लाल रंगाची लघवी होते. लघवी रक्तासारखी दिसू लागते. स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉक होतो. लघवीचा रंग तर बदलतोच पण कधीकधी रक्तही पडते.

पाठदुखी:

पाठ म्हणजे विशेषतः कंबर आणि कबंरेखालील भागात खूप जास्त असह्य वेदना होतात. या वेदना कळा आल्यासारखा येतात तर कधी कधी तासनतास त्रासही होतो. या वेदना तीव्र असल्याने रुग्णाला त्वरित उपचाराची गरज भासते.

मळमळ/उलटी होणे:

अगदी सुरुवातीच्या लक्षणामध्ये पोटात मळमळ होते. काही उलट सुलट खाल्ले नसले तरी ही लक्षणे अचानक जाणवतात. काहींना उलटीचा सुद्धा त्रास होतो. पाठदुखी आणि उलटी मळमळ ही लक्षणे सुरुवातीला सगळ्यांना जाणवतात.

थंडी ताप येणे:

बऱ्याच रुग्णांना किडनी स्टोनमुळे  ताप येणे, थंडी वाजणे या समस्याही होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सूज येणे:

मूतखडे मोठ्या आकाराचे असल्यास ते  मूत्रमार्ग ब्लॉक करतात. त्यामुळे किडनीवर  सूज येते. त्यासोबतच पोट आणि कंबरेच्या भागातही सूज येते. सूज आल्यावर तो भाग खूप दुखतो. हा त्रास असह्य झाल्याने रुग्ण पोट धरून अक्षरशः ओरडतात.

बसल्यावर वेदना होणे:

सुरुवातीच्या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास वेदना  खूप वाढतात. अश्या रुग्णांना शेवटी बसायलाही जमत नाही. बसणेच काय झोपल्यावरही दुखणे थांबत नाही. अश्यावेळी हॉस्पिटलला गेल्याशिवाय पर्याय राहत नाही.

डॉ. इरफान शेख , यूरोलॉजिस्ट (Urologist) आणि यूरो सर्जन (Uro Surgeon) (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील टॉप युरोलॉजिस्टपैकी (Top Urologist in Pune) एक आहेत. डॉ. इरफान शेख हे युरोलॉजी (Urology) विभागातील सुवर्णपदक विजेते आहेत.  त्यांनी पुण्यातील बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले आहे. तसेच  पीजीआय, चंदीगड येथून जनरल सर्जरीमध्ये एमएस केले आहे.  डॉ. इरफान शेख आपल्या रूग्णांवर वर्षानुवर्षे यशस्वीपणे उपचार करत आहेत. Urolife Clinic, Pune तुम्हाला सर्व प्रकारच्या युरोलॉजिकल (Urological) उपचार सेवा प्रदान करते, जसे की किडनी स्टोनचे उपचार, मूत्राशयातील खडे उपचार, प्रोस्टेट कर्करोग उपचार, किडनी कर्करोग उपचार, आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार, RIRS शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोन काढण्यासाठी PCNL शस्त्रक्रिया आणि एन्ड्रोलॉजिकल ट्रीटमेंट (Andrological Treatment) सेवा. तसेच सेक्सोलॉजी थेरपी यावरही उपचार होतात.