UTI: स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग का होतो आणि तो कसा टाळता येईल?

स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) हा एक सामान्य संसर्ग आहे. बहुतांश महिला दैनंदिन कामामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काही महिला  गुप्तांगांच्या समस्यांबद्दल बोलायला  घाबरतात किंवा लाजतात.  लहान सहान समस्यांकडे  दुर्लक्ष केल्यानं मोठ्या आजारांचा धोका वाढत जातो.

मूत्रमार्गाला होणारा संसर्ग(Urinary Tract Infection) हा आजार कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो.  प्रत्येक व्यक्तीचे कारण वेगवेगळे असू शकते मात्र  उष्णता (Heat)वाढल्याने आणि पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे लघवीशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.  ज्या लोकांच्या मूत्रमार्गामध्ये अडथळा (Urinary tract obstruction) येत आहे त्यांना पुन्हा पुन्हा यूटीआय होण्याची शक्यता असते . मूत्रमार्गाला होणारा संसर्ग ही अत्यंत गंभीर व्याधी आहे. त्यामुळेच या संदर्भातील लक्षणे आढळून आल्यास त्याकडे कानाडोळा न करता योग्य उपचार घेणे फायद्याचे ठरते. ही लक्षणे आणि उपचार या विषयी जाणून घेऊ या. 

स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्गचे कारणे:

  1. पाणी कमी पिणे
  2. प्रायव्हेट पार्ट मध्ये स्वच्छतेचा अभाव,
  3. मूत्रमार्गापासून गुदद्वारापर्यंतचे(urethra to anus)अंतर कमी असणे
  4. खाण्यापिण्यातील बदल -आंबट, मसालेदार, साखरयुक्त पदार्थ खाणे
  5. अनियमित जीवनशैली (Irregular lifestyle) यांमुळे महिलांमध्ये UTI म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच्य त्रासात वाढ होत आहे.
  6.  लैंगिक संभोगामुळे सिस्टिटिस (Cystitis due to sexual intercourse)होऊ शकते.लैंगिकदृष्ट्या सक्रिय स्त्रियांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय नसलेल्या स्त्रियांपेक्षा जास्त UTIs असतात.
  7. ज्या स्त्रिया जन्म नियंत्रणासाठी डायफ्राम किंवा शुक्राणुनाशक वापरतात अशा स्त्रियांना धोका जास्त असतो.
  8. रजोनिवृत्तीनंतर (After menopause), इस्ट्रोजेनमध्ये (estrogen)घट झाल्यामुळे मूत्रमार्गात बदल झाल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
  9. किडनी स्टोन (Kindney Sttone) किंवा वाढलेले प्रोस्टेट मूत्राशयात लघवी अडकवतात आणि UTI चा धोका वाढवतात.
  10. मधुमेह आणि इतर रोगांमुळे रोगप्रतिकारक शक्ती बिघडते  आणि UTI चा धोका वाढतो. 

लक्षणे:

  • मूत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे ,
  • सतत लघवीला येणे,
  • मूत्रोत्सर्जन (Urination) करताना वेदना होणे,
  • दाह होणे,
  • लघवीचा रंग गडद असणे,
  • लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे,
  • लघवीचा उग्र वास येणे,
  • ओटीपोटात दुखणे 

उपाय:

  1. भरपूर पाणी प्यावे. पाणी पिण्याने लघवी पातळ होण्यास मदत होते आणि वारंवार लघवी केल्यामुळे संसर्ग सुरू होण्यापूर्वी मूत्रमार्गातून बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत होते 
  2. लघवी केल्यानंतर पुढून मागे पुसावे म्हणजे गुदद्वाराच्या क्षेत्रातील बॅक्टेरिया(Bacteria) योनी आणि मूत्रमार्गात पसरणार नाहीत.
  3. आंबट, मसालेदार, साखरयुक्त पदार्थ  आणि कॅफीन, कार्बोनेटेड पेये, कॉफी, चॉकलेट इत्यादींचे कमी सेवन करावे.
  4. जननेंद्रियासाठी त्रासदायक(Irritating to genital organs) ठरणारे इनरवेअरर्स वापरणं टाळा.
  5. लघवीला लागल्यास तातडीने जाणे, लघवी थांबवून न ठेवणे
  6. या रोगाचे संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे टाळले पाहिजे.
  7. दैनंदिन आहारात तंतुमय अन्न पदार्थ जसे की केळी, मसूर, सोयाबीन, नट, ओट्स आणि इतर संपूर्ण धान्य  यांचा समावेश करावा

कारण ते UTI ला कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा सामना करण्यास मदत करतात. 

अनेक महिलांना आपल्या आयुष्यात एकदा तरी अशा तक्रारीवर उपचार करून घ्यावा लागतो. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. वर दिलेली लक्षणे आढळल्यास लगेच स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.उपचारासाठी संपर्क करा डॉ. इरफान शेखला त्यांचे Urolife Clinic मध्ये.

डॉ. इरफान शेख , यूरोलॉजिस्ट (Urologist) आणि यूरो सर्जन (Uro Surgeon) (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील टॉप युरोलॉजिस्टपैकी (Top Urologist in Pune) एक आहेत. डॉ. इरफान शेख हे युरोलॉजी विभागातील सुवर्णपदक विजेते आहेत.  त्यांनी पुण्यातील बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले आहे. तसेच  पीजीआय, चंदीगड येथून जनरल सर्जरीमध्ये एमएस केले आहे.  डॉ. इरफान शेख आपल्या रूग्णांवर वर्षानुवर्षे यशस्वीपणे उपचार करत आहेत. Urolife तुम्हाला सर्व प्रकारच्या युरोलॉजिकल उपचार सेवा प्रदान करते, जसे की किडनी स्टोनचे उपचार, मूत्राशयातील खडे उपचार, प्रोस्टेट कर्करोग उपचार, किडनी कर्करोग उपचार, आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार, RIRS शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोन काढण्यासाठी PCNL शस्त्रक्रिया आणि एन्ड्रोलॉजिकल ट्रीटमेंट सेवा. तसेच सेक्सोलॉजी थेरपी यावरही उपचार होतात.